अलिबाग: गरोदर माता व बालकांच्या योजनांवर डल्ला?
Alibag, Raigad | Jun 22, 2026 रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती रसिका राजा केणी यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर स्वतःच्याच विभागाचीच झाडाझडती सुरु केली आहे. चार वर्षांच्या प्रशासकीय काळात अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केणी यांनी केला आहे. यासाठी विभागाच्या प्रमुख निर्मला कुचिक यांनाच त्यांनी जबाबदार धरले असून कारवाईची मागणी केली. सभापती रसिका केणी यांनी जिल्हा परिषदेतील त्यांच्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.