नागपूर शहर: 'ऑपरेशन थंडर': नागपुरात अमली पदार्थांच्या तस्करावर मोठी कारवाई: सतीश आडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कपिल नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी 8 जुलैला दुपारी 1 वाजता दिलेल्या माहितीनुसार,नागपूरच्या कपिलनगर पोलिसांनी 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत मोठी कारवाई करत 'लूडो' टोळीतील गौरव उर्फ राकेश नंदगावली याला अटक केली आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी दिली आहे.