नागपूर शहर: जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला; दोन आठवड्यांत दुसऱ्यांदा जीवे मारण्याचा प्रयत्न: अनिता मोरे एसीपी
सहाय्यक पोलीस आयुक्त अनिता मोरे यांनी 2 जूनला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरच्या संवेदनशील महाल भागात सौरभ लक्ष्मीकांत घाटे या तरुणावर तीन हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सौरभ गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागरिकांनी धाव घेतल्याने हल्लेखोर पसार झाले. त्याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अनिता मोरे यांनी दिली आहे.