नागपूर शहर: खापरखेडा येथे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू
खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकलला गाय धडकल्याने गंभीर जखमी झालेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.ही घटना १४ एप्रिल रोजी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादीचे मेहुणे, ईश्वर गोविंदराव वासनिक हे त्यांच्या मोटारसायकलने खापरखेडा हद्दीतील दहेगाव चौकातून जात होते. यावेळी अचानक समोर गाय आल्याने त्यांची मोटारसायकल गाईला धडकली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते.अपघातानंतर त्यांना उपचारासाठी कुणाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.