नागपूर शहर: जनता वाईन शॉपबाहेर मद्यपींचा विळखा; महिलांचे जगणे मुश्कील, पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष
शहरातील पाचपावली परिसरातील कमाल चौक येथे असलेल्या 'जनता वाईन शॉप'बाहेर मद्यपींचा रोजचा अड्डा जमत असून, यामुळे परिसरातील नागरिक, विशेषतः महिला आणि शाळकरी मुलींना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मद्यपींकडून होणाऱ्या गैरवर्तनामुळे आणि छेडखानीच्या प्रकारांमुळे या मार्गावरून जाणेही आता कठीण झाले आहे.