नागपूर शहर: खळबळजनक! मनपाच्या 'गजानन उद्यानात' गांजाची लागवड
नागपूर महानगरपालिकेच्या 'गजानन उद्यानात' चक्क गांजाची झाडे लावली गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजप नेते मुन्ना यादव यांनी या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याने खळबळ उडाली आहे.उद्यानात गांजाची झाडे आढळल्याने मनपा प्रशासन आणि पोलिसांवर टीका होत आहे.मुन्ना यादव यांनी दोषींवर कडक कारवाईची मागणी केली