नागपूर शहर: महाराष्ट्रात परीक्षा म्हणजे 'पेपरफुटी'चा खेळ: लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला! : काँग्रेस नेते वडेट्टीवारं
महाराष्ट्रात सध्या परीक्षांच्या पेपरफुटीचे सत्र सुरू असून, यामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकापाठोपाठ एक होत असलेल्या पेपरफुटीच्या घटनांमुळे राज्यभरातील लाखो कष्टाळू परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.