औंढा नागनाथ: वसमत मार्गावर खंडेश्वरी देवी मंदिराजवळ टँकरला भीषण अपघात; चालक गंभीर जखमी
औंढा नागनाथ ते वसमत मार्गावर खंडेश्वरी देवी मंदिराजवळ भरधाव टँकर क्रमांक एमएच ०४ एफपी ५४७९ या भरधाव टँकर वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर रस्त्यालगत पलटी होऊन भीषण अपघात घडल्याची घटना दिनांक १२ ऑक्टोबर रविवार रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली आहे. राजू तुकाराम केंद्रे वय ५५ वर्षे राहणार परळी तालुका परळी जिल्हा बीड असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे ते अमरावती वरून परळी कडे जात होते यादरम्यान खांडेश्वरी देवी मंदिराजवळ हा अपघात घडला.