नागपूर शहर: तहसील हद्दीत देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्यास अटक
5 जुलै ला दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या तहसील पोलीस पथकाने गस्त घालत असताना एका इसमाला देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले आहे. अटकेतील आरोपीचे नाव इम्रान उर्फ टिपू शेख असे सांगण्यात आले आहे. आरोपीकडून ५२,००० रुपये किमतीचे पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आला आहे.आरोपीवर तहसील पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.