लातूर: रेणापूर नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा निर्धारआगामी निवडणुकीसाठी पक्षाचे निरीक्षक जाहीर
Latur, Latur | Oct 31, 2025 लातूर :–रेणापूर नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने पूर्ण ताकदीने झुंज देत नगरपंचायतीवर आपला झेंडा फडकवण्याचा निर्धार केला असून, ही निवडणूक माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे.त्या अनुषंगाने जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंखे यांनी संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याचे व्हा चेअरमन सचिन पाटील यांची रेणापूर नगरपंचायत निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच प्रभागनिहाय निरीक्षकांची यादीही जाहीर करण्यात आली आहे.