नाशिक: गंगापूर भागातील आनंदवली येथे 23 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन केली आत्महत्या
Nashik, Nashik | Sep 17, 2025 गंगापूर भागातील आनंदवली येथे 23 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून गंगापूर पोलीस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार मनीषा नाना माडे राहणार शिवनगर, आनंदवली, गंगापूर रोड हिने राहत्या घरात पत्राच्या छतास लोखंडी पाईपला नायलॉन दोरी बांधून गळफास घेतला. बेशुद्ध अवस्थेत तिचे वडील नाना माडे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टर गावित मॅडम यांनी तपासून मृत घोषित केले.