लातूर -लातूर जिल्ह्यातील काही दिवसांच्या उघडी नंतर आज सायंकाळी पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्री सुमारे सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान आलेल्या मुसळधार पावसामुळे लातूर शहरात काही मिनिटांतच रस्त्यांवर पाणी साचले. गंजगोलाई, दयानंद कॉलेज परिसर, रयतू बाजार आणि बार्शी रोडवरील भाजी बाजार येथे तर अक्षरशः पाण्याने हाहाकार माजवला.अचानक कोसळलेल्या पावसामुळे भाजीपाला विक्रीसाठी बसलेले अनेक विक्रेते गडबडून गेले. पावसाच्या पाण्यात भाजीपाला भिजून गेला किंवा वाहून गेला,