परवानगी नाकारली तरी शिवाजी पार्कवर हजारोंची गर्दी! CJP आंदोलनात तरुण-तरुणींचा मोठा सहभाग
मुंबईतील शिवाजी पार्क येथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJPच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली होती, तरीही शुक्रवारी हजारो तरुण-तरुणी आंदोलनस्थळी पोहोचल्याचे वृत्त आहे.
मध्य मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. दादर रेल्वे स्थानकाकडून शिवाजी पार्कच्या दिशेने येणाऱ्या मार्गांवरही निर्बंध आणि अडथळे ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे.
या पार्श्वभूमीवरही आंदोलक शिवाजी पार्कपर्यंत पोहोचले. CJPकडून निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित करत ज्ञानेश कुमार यांच्या राजीन्याची मागणी करण्यात आली. आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाल्याचे वृत्त आहे.
🚨 परवानगी नसतानाही शिवाजी पार्कवर हजारोंची गर्दी
🔥 CJP आ