नागपूर शहर: अपघाताचा थरार: शेतावरून घरी परतताना काळाचा घाला; नागपूरच्या व्यक्तीचा रस्ते अपघातात मृत्यू.
माहितीनुसार खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात एका ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मृताची ओळख धरमपेठ भागातील रहिवासी राजकुमार गोविंदलाल काकानी अशी पटली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार काकानी हे बिलोरी बाबुलखेडा येथील त्यांच्या शेतावरून नागपूरला त्यांच्या वाहनाने जात होते. लोनखेरी जवळ त्यांच्या स्कूटरची एका पादचाऱ्याला धडक बसली.