सातारा: ऐतिहासिक शाहूनगरीमध्ये यावर्षी शाही सीमोलंघन सोहळा; विशेष बैठकीत सोहळ्याच्या आयोजनाबद्दल चर्चा
Satara, Satara | Sep 15, 2025 छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या ऐतिहासिक शाहूनगरीमध्ये यावर्षी शानदार आणि शाही सिमोलंघन सोहळा विजयादशमीच्या दिवशी अर्थात दसऱ्या दिवशी साजरा केला जाणार आहे. यावर्षी नेत्रदीपक असा हा सोहळा होणार असून संपूर्ण जिल्हावासियांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. साताऱ्यात सोमवारी दुपारी तीन वाजता या संदर्भात नियोजन बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सोहळ्याचे संयोजक सुनीलतात्या काटकर आणि रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक सुशीलदादा मोझर यांनी माहिती दिली.