लातूर : मंगळवार दि. २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून लातूर शहरात पावसाला सुरुवात झाली आहे. रात्री उशिरापर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस शहरात सुरू असून, नागरिकांनी रेनकोट व छत्र्यांचा वापर करत कामे उरकताना पावसाचा आनंद घेतला. काही ठिकाणी गटारी व रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीत किरकोळ अडथळेही निर्माण झाले आहेत.दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार बुधवार दि. २९ ऑक्टोबर रोजी पहाटे १ वा. जारी केलेल्या सूचनेनुसार, पुढील ३ तासांत म्हणजेच पहाटे ४ वाजेपर्यंत पाऊस पडणार