तालुक्यातील जेना येथुन बैलबंडी व ट्रैक्टरचे लोखंडी पार्ट चोरणाऱ्या दोन आरोपींना भद्रावती पोलीसांनी अटक केली आहे. सदर कारवाई भद्रावती पोलिसांतर्फे दिनांक ८ रोज सोमवारला सायंकाळी ५.३० वाजता करण्यात आली. विनोद ऊर्फ बिल्लू देवगडे व वैभव महादेव दगडी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असुन त्यांच्याकडून २ लक्ष ५० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.