नागपूर शहर: अजनी पोलिसांची धडक कारवाई: दोन अंमली पदार्थ तस्करांना अटक : नितीन चंद्र राजकुमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक
अजनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी 25 एप्रिल ला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार अजनी पोलिसांनी 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत मोठी कारवाई करत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. हिमांशु कडू आणि मोरेश्वर मेश्राम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून एमडी देखील जप्त करण्यात आली आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी दिली आहे.