पनवेल: पनवेल मनपाची मालमत्ता करवसुलीची शतकपूर्ती
Panvel, Raigad | Jun 23, 2026 पनवेल महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत मालमत्ता कर संकलनात १०० कोटी रुपयांचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. महानगरपालिकेकडून मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांना सातत्याने आवाहन करण्यात येत असून ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या आवाहनाला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसादामुळे आतापर्यंत एकूण ८३ हजार ५२ मालमत्ताधारकांनी १०२ कोटी रुपये मालमत्ता कर भरून महानगरपालिकेला सहकार्य केले आहे.