भोकरदन: भामला फाउंडेशन अध्यक्ष असिफ भामला यांचा मा.मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी निवासस्थानी केला सत्कार
आज दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास मा.मंत्री व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे यांनी निवासस्थानी जालना जिल्ह्याच्या पर्यावरण संवर्धनासाठी तसेच वृक्षसंवर्धन,स्वच्छता आणि हरित उपक्रमांना चालना देण्यासाठी भामला फाउंडेशनचे अध्यक्ष असिफ भामला यांच्यासोबत महत्त्वपूर्ण चर्चा केली आहे, व त्यांचा शाल श्रीपुर देऊन सत्कार सुद्धा केला आहे,याप्रसंगी महापौर उपमहापौर व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.