नागपूर शहर: यशोधरानगर पोलिसांची मोठी कारवाई; फरार आरोपीला अटक, लाखोंचे सोन्याचे दागिने जप्त : युनूस शेख वरिष्ठ पोलीस निरीक्षक
यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी 26 जूनला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार,यशोधरानगर पोलिसांनी एका वर्षापासून फरार असलेल्या मुबारक वकील बाबू शाह या आरोपीला अटक केली आहे. चौकशीदरम्यान त्याने यशोधरानगर, कोराडी आणि कलमना परिसरातील ५ घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १० लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले असून, टोळीतील इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी दि