तुमसर शहरातील आजाद वार्ड येथे दि. 16 जानेवारी रोज शुक्रवारला सकाळी 9 वाजताच्या सुमारास तुमसर पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर क्र.MH 36 AL 6195 व त्यातील एक ब्रास रेती असा एकूण 6 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक गोवर्धन कांबळे रा. बोरी याच्याविरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.