नागपूर ग्रामीण: प्रेमाचा दुर्दैवी अंत लग्नाला घरच्यांचा विरोध; प्रेमी युगुलाचे विषप्राशन, प्रियकराचा मृत्यू
: लग्नाला घरच्यांनी विरोध केल्यामुळे टोकाचे पाऊल उचलणाऱ्या प्रेमी युगुलाने विषारी औषध प्राशन केले. सोमवारी रात्री उशिरा उपचार सुरू असताना प्रियकर विशाल विलास जवादे वय २१ वर्ष याचा मृत्यू झाला, तर तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतक आणि वीस वर्षीय तरुणी मध्ये चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते, मात्र लग्नाला घरच्यांचा विरोध होता.