भुदरगड: बाळूमामा ट्रस्टच्या आर्थिक गैरव्यवहारात 5 जणांना अटक
आदमापूर येथील संत सद्गुरू बाळूमामा ट्रस्टमध्ये जमीन खरेदी-विक्रीच्या आर्थिक गैरव्यवहारावर विशेष तपास पथकाने 5 जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये भीष्म जोतीराम पाटील, सागर शिंदे, प्रकाश मांगले, रणजितसिंह सूर्यवंशी आणि तन्मय बाचनकर यांचा समावेश आहे.