वाडा: वाडा शहरातील जुन्या बस स्थानकात काँक्रीटीकरण करण्याचे कामउद्यापासून होणार सुरू, खंडेश्वरी नाका इथून प्रवाशांची चढ-उतार
Vada, Palghar | Jan 23, 2025 वाडा शहरातील जुन्या बस स्थानकात काँक्रीटीकरण करण्याचे काम करण्यासाठी दिनांक 24 जानेवारी 2025 ते दिनांक 24 फेब्रुवारी 2025 या कालावधीत शहरातील जुने बस स्थानक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत वाडा स्थानकातून सुटणाऱ्या सर्व बसेस वाडा आगाराच्या जागेतील बस स्थानकातून सुटतील आणि खंडेश्वरी नाका येथे प्रवाशांची चढ-उतर करतील. खंडेश्वरी नाका येथे प्रवाशांना चौकशी आणि मार्गदर्शन करण्यासाठी वाहतूक नियंत्रक नियुक्त केले जातील.