उत्तर सोलापूर: बँकेकडून शेतकर्यांना वसुलीच्या नोटीसा;संभाजी ब्रिगेडची सात रस्ता येथे जिल्हाधिकारींकडे तात्काळ वसुली थांबण्याची मागणी
अतिवृष्टीमूळे शेतकर्याचे मोठे नूकसान झाले अशातच शेतकऱ्यांना बँकेच्या वसुलीच्या नोटीस निघत आहे त्यामूळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही.सर्व बँकांना शासनातर्फे नोटीस काढून शेतकऱ्यांची कर्ज वसुली तात्काळ थांबवावी व कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना सहा महिन्याची मुदत वाढ द्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड तर्फे दि.२९ रोजी सायं जिल्हाधिकारीकडे करण्यात आली