मोर्शी: बलिप्रतिपदेच्या दिवशी शेतकऱ्यांनी मौन पाळा, माजी आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया
महाराष्ट्रात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली देण्याकरिता बलिप्रतिपदीच्या दिवशी, दुपारी किंवा संध्याकाळी, आपल्या गावात शेतात घरात दिवा लावून शेतकरी शहिदांना, अभिवादन करा अशी प्रतिक्रिया, प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी आमदार बच्चू कडू यांनी आज दिनांक 20 ऑक्टोबरला दुपारी तीन वाजताचेदरम्यान चांदूरबाजार येथून दिली आहे. दिवाळी हा केवळ संण नसून लढ्याची शपथ असल्याची प्रतिक्रिया प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी आमदार बच्चू कडू यांनी माहिती देताना दिली आहे