पनवेल: ग्रीन फेस्टिवल अंतर्गत फटाकेमुक्त दिवाळी जागृतीसाठी पनवेल येथील केएलई महाविद्यालयाच्यावतीने वॉकेथॉन
Panvel, Raigad | Oct 17, 2025 ‘माझी वसुंधरा अभियान ६.० ’ अंतर्गत ग्रीन फेस्टिवल फटाकेमुक्त दिवाळी या कार्यक्रमांतर्गत पनवेल महापालिका व केएलई महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानातून आज शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास कळंबोली येथे वॉकेथॉनचे नुकतेच आयोजन करण्यात आले. आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार पर्यावरणपूरक सण उत्सव साजरे करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाते, त्यानूसार उपायुक्त स्वरूप खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना त्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये ग्रीन फेस्टिवल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.