एरंडोल: वरखेडे खुर्द येथे नदीपात्रात आढळून आला ५८ वर्षीय इसमाचा मृतदेह, मेहुणबारे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
वरखेडे खुर्द या गावातील रहिवाशी अण्णा शंकर तिरमली वय ५८ यांचा मृतदेह गावालत असलेल्या नदीपात्रात मिळून आला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांना तातडीने मेहूणबारे ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. येथे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आला. तर याप्रकरणी मेहूणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.