यावल: किनगाव येथील बसस्थानकावर दुचाकी पिकअप वाहनाचा अपघात,दुचाकीस्वार तरुण ठार,यावल पोलिसात पिकअप चालक झाला हजर
Yawal, Jalgaon | Oct 20, 2025 किनगाव या गावात बस स्थानक आहे. या बस स्थानकाजवळ पल्सर दुचाकी क्रमांक एम.एच.१९ इ.जे.२१७० द्वारे आदित्य उर्फ बाळा प्रमोद पाटील वय २२ हा तरुण येत होता तर यावल कडून चोपड्याकडे पिकअप वाहन क्रमांक एम. एच.१९ बी. एम.४३३२ घेऊन चालक जात होता. दरम्यान या दोन्ही वाहनांचा अपघात घडला. यात दुचाकीस्वार तरुण हा गंभीर जखमी झाला त्याला जळगाव नेण्यात आले तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर पिकअप वाहन चालक हा यावर पोलिस ठाण्यात हजर झाला आहे.