तुमसर: शहरातील पोलीस स्टेशन परिसरात एकाला मारहाण, दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
तुमसर शहरातील पोलीस स्टेशन परिसरा जवळील मनीषा बिअर बार अँड भोजनालयाजवळ फिर्यादी अतुल मानापुरे हा दि. 7 नोव्हेंबर रोज शुक्रवारला सायं.7 वाजता च्या सुमारास उभा असता यातील आरोपी दिशांत वासनिक आणि आरोपी रोशन भजने यांनी फिर्यादीला तू खापा चौकात आर्यन मोटघरे याला का मारले, असे बोलत फिर्यादीच्या डोक्यावर बियरच्या बाटलीने मारून जखमी केले. याप्रकरणी फिर्यादीची तक्रार व प्राप्त वैद्यकीय अहवालावरून दोन्ही आरोपीविरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.