ठाणे: मुंब्रा देवी कॉलनीतील मंदिरात चोरट्याचा कारनामा, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ आला समोर
Thane, Thane | Nov 29, 2025 दिवा परिसरातील मुंब्रा देवी कॉलनी मधील एका मंदिरातील सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. मुंब्रा देवी कॉलनी परिसरात असलेल्या विघ्नेश्वर मंदिरामध्ये एक चोरटा मध्यरात्रीच्या सुमारास शिरला आणि आजूबाजूला काहीही चोरण्यासाठी मिळाले नाही त्यानंतर त्याने दानपेटी टाकलं तर बाजूला नेले आणि तेथे असलेल्या एका पोत्यामध्ये भरून दानपेटी उचलण्याचा प्रयत्न करू लागला. बराच वेळ त्याने प्रयत्न केला. चोरट्याचा हा सर्व कारनामा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून हा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे.