नागपूर शहर: कपिल नगर परिसरात चोरांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीती व संताप, पोलीस गस्त कागदावरच?
26 मे ला दुपारी 5 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार उत्तर नागपूरच्या कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही आठवड्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. चोरांनी दिवस-रात्र उच्छाद मांडला असून नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोरटे प्रामुख्याने मोबाईल, रोकड, सोन्या-चांदीचे दागिने आणि दुचाकी वाहनांना लक्ष्य करत आहेत. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज आणि तक्रारी देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.. या व