मोर्शी: मोर्शी पोलीस स्टेशन हद्दीत विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ, मोर्शी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
आज दिनांक बारा नोव्हेंबरला पोलीस सूत्रांकडून नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मोर्शी पोलीस स्टेशन हद्दीतील एका महिलेचा सासरकडील मंडळी कडून शारीरिक व मानसिक छळहोत असल्याची तक्रार एका पीडित महिलेने दिनांक 11 नोव्हेंबरला सात वाजून चार मिनिटांनी मोर्शी पोलीस स्टेशनला दाखल केली आहे पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी विकास नामदेव शिरभाते, नामदेव शामराव शिरभाते व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे