नागपूर शहर: 'हीरा स्वीट्स'मध्ये सापडला मृत उंदीर; अन्न व औषध प्रशासनाकडून परवाना रद्द
नागपूरच्या पाचपावली परिसरातील प्रसिद्ध 'हीरा स्वीट्स'च्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. किचन मध्ये थेट मृत उंदीर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या गंभीर निष्काळजीपणाची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने या प्रतिष्ठानचा अन्न परवाना तातडीने रद्द केला आहे.