नागपूर शहर: नवतपाच्या काळात नागपुरात अवकाळी पावसाची दमदार हजेरी; तीव्र उकाड्यापासून नागपूरकरांना मोठा दिलासा
30 मे ला दुपारी पाच वाजताच्या सुमारास एकीकडे सूर्यदेव कोपले असून संपूर्ण विदर्भ 'नवतपा'च्या तीव्र उष्णतेच्या लाटेने होरपळत असतानाच, आज नागपुरात हवामानाने अचानक यू-टर्न घेतला. दुपारच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसाच्या जोरदार सरींमुळे नागपूरकरांना असह्य गरमी आणि उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.