यावल: यावलच्या पांडुरंग सराफ नगरात घरात मृत अवस्थेत आढळले पशुवैद्यकीय अधिकारी, पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात पाठवला
Yawal, Jalgaon | Sep 25, 2025 यावल शहरात विस्तारित भागात पांडुरंग सराफ नगर आहे. या नगरात एका भाड्याच्या घरात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.आर.सी. भगुरे हे राहतात. दरम्यान त्यांच्या घरातून गुरुवारी सकाळी दुर्गंधी येत होती पोलिसांना माहिती देण्यात आली तर त्यांचा मृतदेह घरात आढळून आला पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात देण्यात आला आहे. तरी याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू आहे.