सेनगाव: पुसेगांव येथील आरोग्य उपकेंद्रास कुलूप ठोकून गावकऱ्यांनी नोंदविला निषेध
सेनगांव तालुक्यातील पुसेगांव येथील आरोग्य उपकेंद्रास आज कुलूप ठोकून निषेध आंदोलन करण्यात आले आहे. पुसेगांव येथील आरोग्य उपकेंद्रात नियमित लसीकरण होत नसून बालकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या निष्काळजीपणाच्या विरोधात आज ग्रामस्थांनी आरोग्य उपकेंद्राला कुलूप ठोकून आंदोलन केले. तसेच उपकेंद्रामध्ये कायमस्वरूपी नर्स नेमण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली.