चंद्रपूर जिल्हा अमेचूर सिलंबन असोसिएशन व आयुषी स्पोर्ट्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विश्वकर्मा मंगल कार्यालयात शिवराय चषक राज्यस्तरीय सिलंबन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याने प्रथम,यवतमाळ जिल्ह्याने व्दितीय तर पुणे जिल्ह्याने तृतीय स्थान पटकाविले. स्पर्धेत राज्यातल्या २३ जिल्ह्यातील २९८ मुलामुलींनी सहभाग घेतला.