सेनगाव: वाघजाळी येथील ग्रामस्थांनी कार्तिक मासानिमित्त दिंडी सोहळ्याची दीडशे वर्षाची परंपरा ठेवली कायम
सेनगांव तालुक्यातील वाघजाळी या ठिकाणी कार्तिक मासानिमित्ताने मागील दीडशे वर्षाची परंपरा कायम ठेवत गावकऱ्यांनी गावात काकडा दिंडीची अखंड परंपरा जपली आहे. मागील दीडशे वर्षापासून सुरू असलेले काकडा दिंडीची अखंड परंपरा आजही तितक्यात भक्तीभावाने आम्ही उत्साहाने सुरू असुन गावातील तरुण वर्गाने देखील या दिंडीमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. टाळ मृदंगाच्या गजरात गावातून प्रभात दिंडी काढण्यात आली असुन ही अखंड परंपरा वाघजाळी गावच्या सांस्कृतिक,धार्मिक आणि सामाजिक एकतेचे प्रतीक बनले आहे.