नागपूर शहर: आंबा तोडताना झाडावरून पडून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू, टीव्ही टॉवर जवळील घटना
आंबा तोडण्यासाठी झाडावर चढलेल्या एका ७५ वर्षीय सुरक्षा रक्षकाचा तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टीव्ही टॉवरजवळील बसस्टॉपच्या बाजूला असलेल्या एका आंबाच्या झाडावर, मधुकर सखाराम नेवारे वय ७५ हे २२ एप्रिल सकाळी ९:०० वाजण्याच्या सुमारास आंबे तोडण्यासाठी चढले होते. आंबे तोडत असताना त्यांचा तोल गेल्याने ते झाडावरून खाली पडले, ज्यात ते गंभीर जखमी झाले