शांतीनगर परिसरात एका ६० वर्षीय ऑटोचालकाने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. मुरलीधर असे मृतकाचे नाव आहे. गुरुवारी दुपारी प्रवाशांना सोडल्यानंतर त्यांनी म्हाडा क्वॉर्टर परिसरातील एका इमारतीत जाऊन हे टोकाचे पाऊल उचलले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.