लातूर -जळकोट तालुक्यातील मरसांगवी येथे सोमवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत मायलेकीचा पाण्यात वाहून मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. तिरू नदीतील प्रवाह अचानक वाढल्याने ही घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार, मरसांगवी येथील कौशल्या अजय वाघमारे (35) आणि त्यांची कन्या रुक्मिणी अजय वाघमारे (14) या दोघी 3 नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मरीबा वाघमारे यांच्या शेतामध्ये कापूस वेचण्यास जात होत्या. शेत नदीपलीकडे असल्याने त्या नदी ओलांडत होत्या.