नागपूर शहर: अंबाझरी पोलिसांकडून ऑटो चोरीचा छडा; एक अटकेत : राजेश लोही पोलीस उपनिरीक्षक
अंबाझरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश लोही यांनी 7 जुलैला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार गोकुलपेठ परिसरातून ऑटो चोरणाऱ्या सूरज आत्राम या सराईत गुन्हेगाराला अंबाझरी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने ४० हजार रुपये किमतीचा ऑटो चोरी करून तो तेलनखेडी परिसरात लपवून ठेवला होता. सुटे भाग विकण्याच्या उद्देशाने ही चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. त्याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक राजेश लोही यांनी दिली आहे.