अमरावती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अमरावती रोड शो वर माजी आमदार यशोमती ठाकूर यांची टीका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीमध्ये आले, खरे तर अमरावती त्यांचे आजोळ आहे. त्यांनी लोकांचा अपेक्षाभंग केला. अमरावतीचा विकास झाला नाही. दोन्ही सत्ताधारी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांचे समर्थक अपक्ष आपापसात भांडत आहेत. त्यांना विकासाचे कामाचे काही देणे घेणे नाही. धर्माच्या नावाने राजकारण करणारे लोक एका संत महात्म्याचा अपमान सर्वांनी पाहिलेला आहे. आम्ही काँग्रेसचे सर्व धर्म समभाव मानणारे आहोत, आम्हाला धर्म समजतो... अशी टीका माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे.