नागपूर शहर: दिघोरीत चार दिवसांपासून अडकलेल्या दुर्मिळ पांढऱ्या घुबडाची सुटका
दिघोरी येथील 'विदर्भ सेलिब्रेशन' परिसरातील एका बंद खोलीत चार दिवसांपासून अडकलेल्या दुर्मिळ पांढऱ्या घुबडाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.आज सकाळी ११ वाजता प्रशांत लिल्हारे यांना खोलीतून आवाज आल्याने त्यांनी पाहणी केली असता, त्यांना तिथे पांढऱ्या रंगाचा मोठा घुबड दिसला. चार दिवसांपासून काहीही न खाल्ल्याने हा घुबड प्रचंड अशक्त झाला होता.