सेलू: जंगलापूर फाट्यावर तिघांना दगडाने मारहाण, सेलू पोलिसांत गुन्हा नोंद
Seloo, Wardha | Oct 20, 2024 मुलीला घेण्यासाठी आलेल्या आई, वडील आणि काकुला तिघांनी दगडाने आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. ही घटना ता. 20 रविवारी सायंकाळी 6.30 वाजताच्या दरम्यान तालुक्यातील जंगलापूर फाट्यावर वर्धा-नागपूर रोडवर घडली. ज्ञानेश्वर गोविंदा शिंदे वय 48 रा. पांढरकवडा जिल्हा यवतमाळ यांच्या फिर्यादीवरून करण कदम, संगीता कदम व नरेश जगताप सर्व रा. जंगलापूर यांच्या विरोधात रात्री 8 वाजता गुन्हा नोंद करण्यात आला. अशी माहिती सेलू पोलिसांनी दिली.