तुमसर: शहरातील तहसील कार्यालय परिसरात एका युवकावर चाकू हल्ला करणाऱ्या आरोपी विरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल
तुमसर शहरातील तहसील कार्यालय परिसरात आरोपीने एका युवकावर चाकू हल्ला करून जखमी केल्याची घटना दि.14 सप्टेंबर रोज रविवारला सायं.7 वा.च्या सुमारास घडली. यातील फिर्यादी डगलस शेंद्रे याला आरोपी विलास तिडके यांनी भेटायला बोलावले. भेटीदरम्यान त्यांच्यात वैयक्तिक वादातून भांडण झाले याच वादातून आरोपीने फिर्यादीवर भाजी कापण्याच्या चाकूने हल्ला चढवून जखमी केले याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.