नागपूर शहर: गुन्हे शाखा युनिट पाच ची मोठी कामगिरी: ५ घरफोडीचे गुन्हे उघडकीस, तिघे अटकेत
19 जूनला सायंकाळी 6 वाजता माहितीनुसार नागपूर गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकाने घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी आरोपी आयुष उर्फ आमला नंदलाल गणवीर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने भांडेवाडी, वाठोडा आणि पारडी पोलीस ठाणे हद्दीत एकूण ५ घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.