नागपूर शहर: नागपुरात शिक्षकांच्या आंदोलनचा शंखनाद ; अशैक्षणिक कामांचा विरोध
नागपूर येथील संविधान चौकात प्राथमिक शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले. शालेय शिक्षकांना अशैक्षणिक कामांत गुंतवण्याला या आंदोलनात तीव्र विरोध दर्शवण्यात आला. शिक्षकांना शिक्षणाव्यतिरिक्त इतर अशैक्षणिक कामे देणे बंद करावे. शिक्षकांना केवळ शिकवण्याचे काम मिळावे, अशी शिक्षकांची प्रमुख मागणी आहे.